#SoyaraStories
Share
"व्यवसाय व्यावसायिकांना माणूस म्हणुन समृद्ध करत असतो." तरतर्हेचे लोक भेटतात, त्यांची - आपली आयुष्ये काही ना काही निमित्ताने एकमेकांना स्पर्शून जात असतात. आपल्या आठवणींच्या वहीत असे छोटे मोठे किस्से आपण नोंदवत राहतो. काही जणांशी असे काही नाते जुळून येते कि जणु पूर्व जन्मीचे ऋणानुबंध असावेत तर काही वेळा एखादीच भेट होते न होते पण तरीही ती भेट गोष्ट रुपाने कायमची मनात लिहिली जात असते.
माझा तर व्यवसायच असा आहे कि लोकांच्या आनंदाच्या प्रसंगात मला आपोआप एक वाटेकरी व्हायला मिळते त्यामुळे अनेक हृद्य आठवणी अणि किस्से ऐकायला मिळतात.. या गोष्टी सगळ्यांना सांगायला मला नेहमीच आवडतात. . सध्या अनायासे भरपूर मोकळा वेळ मिळतो आहे , "लिखाण" या माझ्या आवडत्या पण मागे पडलेल्या छंदासाठी तो वेळ द्यायचा मी प्रयत्न करणार आहे . म्हणुनच अधेमधे आठवतील, घडतील तशा या गोष्टी मी इथे लिहायचे ठरवले आहे
या गोष्टींमध्ये मी बर्याच ठिकाणी खरी नावे टाळून लिहीन. काही ठिकाणी ती ओघाने येऊ शकतील. पण एक नक्की की आलेले अनुभव, अणि जमलेल्या आठवणी हा ठेवा 100% खरा अणि किमती असणार आहे
तुम्हाला आवडतील अशी आशा आहे त्यासाठी #SoyaraStories असा hashtag create करत आहे म्हणजे पुढे जर गुरुकृपेने बरेच लिखाण झाले तर एका जागी सापडायला सोप्पे होईल
सोयरा एथनिक्सशी संबंधित तुमचीही काही खास आठवण असेल तर मला नक्की कळवा.
लवकरच भेटू तर एखाद्या गोड गोष्टीच्या निमित्ताने !
श्रावणी काळे