Cutest Story
Share
परवाच Facebook memories मध्ये हा फोटो flash झाला अणि एक गोड गोड आठवण ताजी झाली
आजवर सहभाग घेतलेल्या प्रत्येक प्रदर्शनाच्या काही ना काही कडू गोड आठवणी आहेत. काही ना काही निमित्ताने त्या वर येत राहतात.
हा फोटो आहे 6 वर्षापूर्वीच्या एका उन्हाळी प्रदर्शनात काढलेला.
तेव्हा उन्हाळ्यासाठी साजेसे कॉटनचे कुडते पहिल्यांदाच शिवले होते. एका टेबलवर नेहमीप्रमाणेच सगळ्या अॅक्सेसरीज मांडून ठेवल्या होत्या. सुरवातीला 3वर्षं मी एकटीच स्टॉल सांभाळायचे. त्यामुळे बरेचदा खूप गडबड गोंधळ ही व्हायचा,कारण कपड्यांचा stand अणि accessories चं टेबल असं दोन्हीकडे एका वेळेस बघणं गर्दीत अशक्य व्हायचं..
त्या दिवशी पण संध्याकाळी अचानक खूप गर्दी झाली. मी ग्राहकांना कुर्तीज दाखवत होते. 10 -15 मिनिटांनी जेव्हा परत टेबल जवळ आले तेव्हा पहिलं तर टेबलावर मांडलेल्या जयपूरी मोजड्यांचा एक जोड गायब होता आणि त्या जागेवर गुलाबी फर च्या छोट्याशा बुटीज ठेवल्या होत्या. ते बघून मला फारच गंमत वाटली. आणि असं करणारी ठकी कोण असेल याची उत्सुकता पण वाटत होती.
थोड्याच वेळात एक मायलेकीची जोडी आली.. आईच्या नकळत ठकीनं तिला आवडलेल्या मोजड्या टेबलावरून उचलून स्वतःच्या पायात घातल्या होत्या आणि त्या बदल्यात स्वतःच्या बुटीज अगदी नीट ओळीत मांडून ठेवल्या होत्या. आईच्या ते लक्षात आल्यावर ती लगेच स्टॉल शोधत परत आली. मी काय म्हणेन ही धाकधूक होतीच.. पण मला तर आधीपासूनच हसू येत होतं.. मग तिथे एकदा ओळख झाल्यावर दोघी येत राहिल्या. अगदी साता समुद्रापार गेल्या तरी अजूनही आमचे बंध तसेच आहेत आणि पुढेही ते असेच राहतील हे नक्की